बजेटवर टीका करताना राहुल गांधींना आठवला मोदींचा व्यायाम! म्हणाले…

नवी दिल्ली |  केंद्रिय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी अर्थसंकल्प अतिशय चांगला असल्याचं म्हटलं तर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवलीये. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना पंतप्रधान मोदींचा व्यायामाचा व्हीडिओ ट्वीट केला आहे.

मोदीजी आपल्या जादुई व्यायामाचा दिनक्रम पुन्हा चालू करा… तुमचा हाच व्यायाम अर्थव्यवस्थेला रूळावर आणू शकतो  अशी मिश्किल टिप्पणी करत राहुल यांनी अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या घडीवर आणि अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद नाही. बेरोजगारीच्या मुद्यावर कुठलाच उपाय नाही. सरकार बेरोजगारीचं काही करणार आहे की नाही??, असा सवाल राहुल यांनी केंद्र सरकारला केला आहे. या अर्थसंकल्पनेनं कररचनेला आणखी क्लिष्ट केलं आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत गुंतागुंतीचा आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना अडीच तासांचं अतिशय लांबलचक भाषण केलं. यामध्ये मला महत्त्वाचं काहीच वाटलं नाही. अतिशय गुंतागुंतीचा अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला, असं राहुल गांधी म्हणाले.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत जाऊन भारताने लोळवलं! ऐतिहासिक व्हाईटवॉश….

-काँग्रेस राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना हैरान केल्यानंच ते सुट्टीवर गेलेत- नितेश राणे

-तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात; भाजपच्या बबन लोणीकरांचं धक्कादायक वक्तव्य

-“मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ म्हणणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले, हे तर ठग्ज आँफ मुंबईकर!”

-लग्नाचं वय 18 असावं की 21?, आर्चीचं तोंडात बोट घालायला लावणारं उत्तर….!