महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

नवी दिल्ली | महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

दाटीवाटीच्या परिसरत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. दिल्ली, मुंबई, पुणे या भागात दाटीवाटीची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळायला हवी, असं मत राहुल गांधी यांनी मांडलं.

देशात कोरोना वाढत चालला आहे. आम्ही आदराने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारु इच्छितो की, तुमचा बी प्लॅन काय आहे?, असं राहुल गांधी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!

-“पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी, एकदा गुजरातची अंधारकोठडी बघायला जा”

-‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

-“विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेतला जाईल”

-“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास 14 वर्षांचा असेल हे आम्ही खात्रीने सांगतो”