देशातल्या तरूणांना रोजगार देणं तुमचं कर्तव्य- राहुल गांधी

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यानंतर भाजप नेत्यांनी दशकातला सर्वोत्तम अर्थसंकल्प असं म्हटलं तर विरोधी पक्षांनी कुचकामी आणि निराशाजनक बजेट, अशी टीका केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना भारताचं जे भविष्य आहे त्या युवांना आपण अर्थसंकल्पातून काय दिलं? निर्मलाजी, माझ्या प्रश्नांना घाबरू नका मी तरूणांच्या रोजगाराचे प्रश्न विचारतोय, असं ठणकावून सांगत देशातल्या तरूणांना रोजगार देणं तुमचं कर्तव्य आहे, असं म्हटलंय.

राहुल गांधी शनिवारपासून ट्वीट करत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अर्थसंकल्पातून देशातल्या जनतेच्या हाती काहीच लागलं नाही आणि लागणार नाही, असं ते म्हणालेत.

आज त्यांनी ट्वीट करत अर्थमंत्र्यांनी माझ्या प्रश्नांना घाबरून जाण्याची काही एक गरज नाही. मी देशातल्या तरूणांच्या नोकरीचे प्रश्न विचारतोय. दिवसेंदिवस नोकरीचा प्रश्न गहन होत चालला आहे. बेरोजगारी वाढते आहे. त्यावर सरकारने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. मात्र सरकार काहीही करताना दिसत नाही, अशी टीका राहुल यांनी केली आहे.

दुसरीकडे ‘भास्कर’ ग्रुपला अर्थमंत्र्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी बोलताना आम्ही युवांना किती रोजगार देणार आहोत, याचा नेमका आकडा सांगणं कठीण आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याचा देखील राहुल यांनी समाचार घेतला.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-शब्द जरा जपून वापरा; सुप्रिया सुळेंचा आशिष शेलार यांना सल्ला

-“मी छोट्या आणि मोठ्या भावाच्या कात्रीत सापडलो होतो”

-हिंदुत्वाचं वचन मोडलं जात असेल तर मला असलं हिंदुत्व मला नको- मुख्यमंत्री

-“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं त्यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह देखील ढोंगीच”

-सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही- विक्रम गोखले