Rahul Gandhi: “राहुल गांधी 2024 ला देशाचे पंतप्रधान होणार”

मुंबई | भाजप सत्तेत आल्यानंतर काँग्रेसची ताकद हळूहळू कमी होत आहे. अनेक राज्यात काँग्रेस तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. त्यानंतर आताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

अशातच आता काँग्रेसमध्ये खडाजंगी पहायला मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेसचं पुढे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर देखील मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत सत्तेत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद मिळावं, यासाठी मागणी केली होती. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं ट्विट नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावरून नाना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर देखील नाना पटोले यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत. त्यामुळे 2024 साली ते पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

2019 च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती, अशं खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. जनता आता भाजपला कंटाळली आहे, त्यामुळे काँग्रेसच देशासाठी उत्तम पर्याय ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं पहायला मिळतंय. त्यावर नाना म्हणाले, हे तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं थोडं फार कमी जास्त होणारच.

महत्त्वाच्या बातम्या – 

काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”