नवी दिल्ली | उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्ष-बाधकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर सर्वाधिक खोटं बोलल्याचा आरोप केला. ते म्हणाले, पंतप्रधान इतके खोटे बोलले की टेलिप्रॉम्प्टरलाही ते सहन होत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात भाषण देत होते. या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लाटेचाही उल्लेख केला. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावरून राहुल गांधींनी मोदींवर निशााणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग भाषण करत असतात, त्यांच्या भाषणाची तारीफही होत असते. मात्र यावेळी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे ते बोलत असताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याचा. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाच दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटला ऑनलाइन संबोधित केलं, ज्यात इतर अनेक जागतिक नेते सामील झाले होते जे 2022 मध्ये जगाच्या स्थितीबद्दल त्यांचे व्हिजन सामायिक करतील.
भाषणादरम्यानच त्यांच्यासमोर बसवलेला टेलिप्रॉम्प्टर खराब झाला, ज्यामध्ये ते त्यांचं भाषण वाचत होते. पीएम मोदींना भाषणाच्या मध्यभागी थांबावं लागले, परंतु काही वेळाने त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं.
यावरून अनेक विरोधी पक्ष आणि नेत्यांनी पीएम मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींवर खिल्ली उडवल्यानंतर एका यूजरने व्हिडिओ शेअर केला आहे.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नाही, अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती
‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…
“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”