“एक नाही दोन भारत झालेत, मोदी सरकारने…”; राहुल गांधींचा संसदेत भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली | देशवासियांचं लक्ष लागून राहिलेला देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मांडला आहे. देशाच्या अर्थसंकल्पावर सीतारमण यांनी तब्बल दीड तास भाषण केलं आहे.

आपल्या अर्थसकल्पाच्या मांडणीत अर्थमंत्र्यांनी देशात येत्या काळात किती गुंतवणूक होणार आणि किती काम केलं जाणार यावर भाष्य केलं आहे. सरकारच्या या अर्थसंकल्पावर आता राजकीय चर्चा रंगत आहेत.

केंद्र सरकारनं देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता संसदेत त्यावर चर्चा चालू आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रपतींच्या भाषणावर संसदेत आता अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी चर्चा चालू आहे. राष्ट्रपतींच भाषण खरेपणापासून खुप लांब होतं. त्यांनी देशातील प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केलं नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधींनी देशात वाढत चाललेल्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारला चांगलंच घेरलं आहे. देशाच्या 50 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात भीषण बेरोजगारी असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

काॅंग्रेसचं सरकार असताना देशात 10 वर्षात तब्बल 27 कोटी रोजगार निर्मीती करण्यात आली होती. पण मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळात तब्बल 23 कोटी नागरिकांना बेरोजगार केल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.

सरकारनं केलेल्या नोटबंदीनं आणि जीएसटीनं देशात दोन गट पडले आहेत. देशातील गरीब आणि असंघटीत क्षेत्रावर मोठा घात केला आहे. भारताची विभागणी श्रीमंत भारत आणि गरीब भारत अशी झाली आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

देशातील शेतकऱ्यांवर मोदी सरकारनं मोठा अन्याय केला आहे. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या सुविधा देण्यात सरकार असमर्थ ठरलं आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींच्या भाषणानंतर राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता

 रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…