नवी दिल्ली | राज्यातील सामान्य शहरापासून देशाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजधानी दिल्लीपर्यंत सर्वांच्या नजरा जागतिक स्तरावरील पेगासस नावाच्या साॅफ्टवेअरवर पडल्या. जेव्हा हे पेगासस प्रकरण समोर आलं.
पेगासस या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींची हेरगिरी केल्याचा आरोप देशभरातून केंद्र सरकारवर ठेवण्यात आला होता. परिणामी देशाचं राजकारण तापलेलं होतं. आता परत एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदर काही दिवसांपूर्वी पेगाससच्या माध्यमातून भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या अन् देशात मोठा गोंधळ निर्माण झाला. अशात काॅंग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पत्रकार, वकील, न्यायाधीश, राजकीय नेते, केंद्र सरकारमधील मंत्री, विरोधी पक्षनेते, राज्याचे नेते अशी एकापेक्षा अनेक क्षेत्रातील मान्यवरांची नावं या हेरगिरी प्रकरणात पुढं आली होती.
आता परत एकदा देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका सुरू होण्याच्या अगोदर पेगासस प्रकरणातील नवी यादी समोर आली आहे. या यादीतील नावांनी देशात खळबळ माजली आहे. या यादित काॅंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी याचं नावही समोर आलं आहे.
मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
न्यूयाॅर्क टाइम्सनं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारत सरकारनं 2017 मध्ये इस्राईलकडून सुरक्षा सौद्यामध्ये पेगासस खरेदी करण्यात आलं होतं, असं टाईम्सनं म्हटलं आहे.
इस्राईल कंपनीनं तब्बल 300 कोटी रूपयांना पेगासस भारत सरकारला विकलं आहे. सरकारनं हे भारतातील हेरगिरीच्या उद्देशानं विकत घेतल्याची टीका विरोधकांनी सरकारवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे