नवी दिल्ली | झारखंडमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि राज्यात बदल घडवून आणला जाईल, असं आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे.
छत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यानंतर तेथील काँग्रेस सरकारने एका वर्षांत राज्यातील चित्र बदलून टाकलं आहे, छत्तीसगडमध्ये भाजपच्या राजवटीत आदिवासींकडून जमीन बळकावून ती उद्योगपतींना देण्यात येत होती, असा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला आहे.
आम्ही आदिवासींच्या हिताचे वन हक्क कायद्याचे विधेयक आणलं आणि भाजपचं चुकीचं काम थांबवलं, टाटांकडून जमीन परत घेऊन ती आदिवासींना परत करण्यात आली आणि हे इतिहासात प्रथमच घडलं, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
दरम्यान, आदिवासींकडे पाणी, वन आणि जमीन आहे आणि या स्रोतांवरील त्यांच्या हक्कांचे काँग्रेस रक्षण करेल, असंही राहुल गांधींनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“सरकार आता दाऊदवरील गुन्हेही मागे घेऊन क्लीन चीट देणार” – https://t.co/4KJ9P5VInw @mohitbharatiya_ @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“सरकार आता दाऊदवरील गुन्हेही मागे घेऊन क्लीन चीट देणार” – https://t.co/4KJ9P5VInw @mohitbharatiya_ @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
हवा को गुमान था…अपनी आजादी पर..; संजय राऊतांची ट्विट मालिका सुरूच! – https://t.co/vdoYAEL9on @rautsanjay61 @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019