नथुराम गोडसेला मानतो हे सांगायची मोदींमध्ये धमक नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीत काहीच फरक नाही. दोघांची विचारसरणी सारखीच आहे. दोघांमध्ये फरक इतकाच आहे की गोडसेची विचारसरणी आपल्याला मान्य असल्याचं सांगण्याची धमक मोदींमध्ये नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. केरळमधील वायनाडमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते आले होते.

भारतीयांना भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोदी भाग पाडत आहेत. मोदींमध्ये प्रचंड प्रमाणात राग भरलेला असून प्रत्येकानं आपल्याला पटेल तो धर्म पाळावा हे गांधींचं तत्त्व मोदींच्या लक्षात येत नाही, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.

देशातील नागरिकांना भारतीय असल्याच सिद्ध करण्यास भाग पाडण्यात येत असून भारतीय कुणाला म्हणायचं हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण? असा सवालही राहुल गांधींनी विचारला आहे.

दरम्यान, माझं भारतीयत्व विचारण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला? असं विचारत मी भारतीय आहे हे मला माहितेय आणि ते कुणाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही, असंही राहूल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना व्हायरस भारतात दाखल; केरळमध्ये पहिला रूग्ण आढळला

-देशप्रेमी नागरिकांनी मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं; बाळा नांदगावकरांचं आवाहन

-राज ठाकरेंच्या इंजिनाला भाजपचं इंधन?? राज आणि आशिष शेलार यांची तासभर चर्चा

-मुनगंटीवारांना हे शहाणपण आधी का सुचलं नाही?- नवाब मलिक

-फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती