“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”

नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वरील व्याजदर 8.1 टक्क्यांपर्यंत आणल्याबद्दल निशाणा साधला. लोक कल्याण मार्ग पत्ता ठेवून लोकांचं कल्याण होत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे भले होत नाही. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,मोदी सरकारने सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटक दिला आहे. जे कर्मचारी आपल्या कमाईचा काही भाग वाचवतात आणि भविष्यासाठी ठेवतात त्यांना आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर कमी व्याज मिळेल.

केंद्र सरकारने 2021-22 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर 8.1 टक्के व्याजदराची परवानगी दिली आहे. या निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मार्चमध्ये भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज 8.1 टक्के कमी केलं. तर यापूर्वी हा दर 8.5 टक्के होता. पण आता लोकांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवर 8.1 टक्के व्याज मिळणार आहे.

EPFO ने शुक्रवारी एक आदेश जारी केला ज्यानुसार कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EPF योजनेच्या प्रत्येक सदस्यासाठी 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज दराने केंद्र सरकारची मान्यता सामायिक केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! महागाई वाढत असताना नोकरदारांना मोदी सरकारचा मोठा धक्का 

केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा! 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!