काँग्रेसचं मिशन 2024; राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय

उदयपूर | राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे ‘नव संकल्प शिबिर’ सुरू असून, त्याचा आज शेवटचा दिवस आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष पुन्हा पूर्ण ताकदीने उभा करण्यासाठी काँग्रेसने राहुल गांधींच्या पदयात्रेचं नियोजन केल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी पुढील एका वर्षात काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करतील, त्यातील बहुतांश ‘पदयात्रा’ असेल.

या माध्यमातून काँग्रेस देशातील जनतेला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती समोर आलीये. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

G23 च्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष संसदीय मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘नव संकल्प शिबिर’च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मे रोजी पक्षाचे सरचिटणीस, राज्याचे प्रभारी, राज्य युनिट अध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीतच वरील विषयांवर चर्चा होऊन सर्वांनीच या आराखड्याला सहमती दर्शवल्याची माहिती आहे.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, पी चिदंबरम, भूपेंद्र सिंह हुडा, कमलनाथ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास, गौरव गोगोई, डॉ. अशोक गेहलोत यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…नाहीतर तुमचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते” 

जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं

“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो” 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”