राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | देशात काही दिवसांमध्ये पाच राज्यातील निवडणुकांना सुरूवात होणार आहे. निवडणूक आयोगानं पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

आयोगानं गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब या राज्यातील 690 विधानसभा जागांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. परिणामी सध्या राजकीय पक्षांची पळापळ चालू आहे.

निवडणुका जाहीर झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात सध्या काॅंग्रेसची सत्ता आहे. परिणामी सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे.

सध्या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे या राज्यातील सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला बंडखोरीला सामोरं जावं लागतं आहे.

भाजपच्या विद्यमान मंत्र्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी भाजपच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. अशातच काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तराखंड निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाची घोषणा केली आहे.

काॅंग्रेसवर नेहमीच घराणेशाहीची टीका होत असते. अशात उत्तराखंड निवडणुकीमध्ये एकाच परिवारात एक तिकीट देण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. गांधी यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

उत्तराखंडमध्ये सध्या काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे आपल्या मुलाला तिकीट मिळावं म्हणून आग्रही आहेत. अशात आता राहुल गांधींच्या या निर्णयानं रावत यांना धक्का बसल्याचं मानलं जातं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप सरकारमधील मंत्री यशपाल आर्य आपल्या मुलासह काॅंग्रेसमध्ये आले आहेत. अशात आता आर्य पिता-पुत्रांना तिकीट देण्यात येतं का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गतनिवडणुकीत काॅंग्रेसनं एक परिवार एक तिकीट हे धोरण पंजाबमध्ये राबवलं होतं. याचा मोठा फायदा पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काॅंग्रेसला झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर

पोस्टाची भन्नाट योजना; दरमहिन्याला पैसे कमवण्याची संधी