सिद्धार्थ आणि शहनाजच्या नात्याविषयी राहुलने केला मोठा खुलासा म्हणाला, ते दोघे…

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सिध्दार्थचा अकाली झालेला मृत्यू हा अनेकांना धक्का देऊन गेला आहे. सिध्दार्थच्या अनेक चाहत्यांचा अद्याप देखील सिध्दार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही.

या बातमीनंतर सिद्धार्थची मैत्रिण अभिनेत्री शहनाज गीलची अवस्था खूप वाईट झाली आहे. तिला सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख सहन होत नाही. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजचे काही फोटोज समोर आले होते. हे फोटो पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर अनेक कलाकारांनी शहनाजची भेट घेतली आणि प्रत्येकचजण शहनाजला भेटून हळहळला. अशातच आता अभिनेता राहुल महाजन याने देखील शहनाजची भेट घेतली आहे. शहनाजच्या भेटीनंतर त्याने शहनाजच्या वाईट स्थितीबद्दल माहिती दिली आहे. तसेच शहनाज आणि सिद्धार्थचे नाते हे पती पत्नीच्या नात्यापेक्षा घट्ट होते, असं देखील राहुलने यावेळी सांगितलं आहे.

राहुल महाजन म्हणाला की, शहनाज सध्या पूर्ण शॉकमध्ये आहे आणि तिचा अजून देखील या गोष्टीवर विश्वास बसत नाही. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी तिची स्थिती पाहून मी थरथर कापत होतो. शहनाजकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की जणू एक वादळ आलं आणि सर्वकाही उद्धवस्त करुन गेलं.

ज्यावेळी मी शहनाजच्या खांद्यावर हात ठेवून शोक व्यक्त केला त्यावेळी मी तिची अवस्था पाहून पूर्णपणे हादरलो होतो. ती पूर्णपणे सुन्न झाली आहे, अशी माहिती राहुलने दिली आहे.

दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली होती. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.

या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चक्क पक्षी रडतोय लहान बाळासारखा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

बॉयफ्रेंडसोबत स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

डान्स करायच्या नादात चक्क टीव्हीच घेतला अंगावर, पाहा चिमुकलीचा मजेशीर व्हिडीओ

अभिनेता सोनू सूदने केलेला स्टंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! सिद्धार्थ शुक्ला प्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा