Top news खेळ

राहुल तेवतियाने पाच चेंडूत पाच षटकार मारले, युवराज सिंह घाबरून म्हणाला…

नवी दिल्ली | तेरा वर्षांपूर्वी म्हणजेच १९ सप्टेंबर २००७ चा टी २० सामना आठवतोय ना? प्रत्येक क्रिकेट प्रेमीला हा दिवस आठवणीत असेलच. भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंह याने इंग्लंडचा स्टुअर्ड ब्रॉड या जलद गोलंदाजाच्या एका षटकात तब्बल ६ षटकार मारले होते.

युवराज सिंह याने सहा षटकार मारून क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. हा विक्रम अजून कोणताही खेळाडू मोडू शकला नाही. पण आयपीएल सामन्यात एका फलंदाजाने त्या षटकारांची आठवण प्रत्येक क्रीडा रसिकाला करून दिली, एवढं मात्र नक्की.

२०२० च्या आयपीएलमध्ये ९ वा सामना राजस्थान रॉयल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल संघाचा राहुल तेवतिया याने जोरदार फटकेबाजी केली. शेल्डन कॉटरेल या गोलंदाजाच्या पाच चेंडूमध्ये पाच षटकार मारले.

या षटकात चार चेंडूत सलग चार षटकार मारले. त्यातच राहुल तेवतिया याने १८ व्या षटकात शेल्डन कॉटरेल या गोलंदाजाच्या षटकात पाच षटकार मारून संपूर्ण सामन्याचे रूपच बदलून टाकले.

राहुल तेवतिया याचे असे रूप पाहून युवराज सिंह याचेही काळजाचे ठोके चुकले. कारण राहुल तेवतिया याची फलंदाजी पाहून युवराज सिंहला वाटले की, त्याने ६ चेंडूत सहा षटकार मारलेला विक्रम मोडीत निघतो की काय. पण तसं घडले नाही. केवळ एका चेंडूमुळे हा विक्रम होऊ शकला नाही.

यावर युवराज सिंह याने ट्विट करून त्यात लिहिलंय,”राहुल तेवतिया ना भाई ना. तुझे धन्यवाद, एक चेंडू गमावल्याबद्दल. काय सामना झालाय, राजस्थान संघाला या शानदार विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मयंक अग्रवाल महान खेळी. तेजस्वी संजू सॅमसन.”

राहुल तेवतिया याने एका षटकात पाच षटकार मारून हा सामना बहारदार केला. त्याचबरोबर या सामन्यात मयंक अग्रवाल याने शानदार शतक ठोकून मोठ्या धावांचे लक्ष पार करण्यास मदत केली. किंग्ज इलेव्हन पंजाबला चार विकेटने हरवले. आयपीएलमध्ये एवढे मोठे लक्ष पार करून राजस्थानने एक नवा विक्रम केला आहे.

राजस्थान रॉयल संघासमोर २२४ धावांचा डोंगर होता. अखेरच्या तीन षटकात त्यांना ५१ धावांची गरज होती. एवढे मोठे लक्ष पार करण्यासाठी संजू सॅमसन याने ४२ चेंडूत ८५ धावा करून चार चौके आणि सात षटकार मारले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने २७ चेंडूत ५० धावा करून सात चौके आणि दोन षटकार मारले. राजस्थान रॉयलने १९.३ षटकातच सहा विकेट राखून २२६ धावा करून विजयी वाटचाल केली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!

‘मला लवकर न्याय मिळाला नाही तर मी…’; अनुराग कश्यपवर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप करणाऱ्या पायलचा ईशारा

लग्नानंतर काही दिवसांतच पतीपासून वेगळी झालेली ‘ही’ अभिनेत्री म्हणतेय; ‘हनिमूनच्या दिवशी रात्रभर त्यानं…’

धर्मा प्रोडक्शनचा गजा.आड झालेला ‘हा’ निर्माता म्हणतोय; ‘अं.मली पदार्थ प्रकरणी मला…’

एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…