ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!

मुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या टीमनं अनेकांना आपल्या धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शनिवारी आणखी एका अभिनेत्याच्या घरी छापा टाकला आहे. बाॅलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरी हा छापा टाकण्यात आलेला आहे.

ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याच्या आरोपावरून अरमान कोहलीच्या घरी हा छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईतून पोलिसांना काही वस्तु सापडल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे. सध्या अभिनेत्याची कसून चौकशी सुरु आहे.

शुक्रवार, 27 ऑगस्टपासून एनसीबीकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये एनसीबीनं आतापर्यंत एकूण 15 हून अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केलेली आहे. याच ड्रग्स तस्करांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर एनसीबीनं छापा टाकला आहे.

अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबी टीम त्याला मुख्य कार्यालयात घेऊन गेली. मात्र, या छाप्यासंबंधीत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अशातच कालच एनसीबीनं टिव्ही अभिनेता गौरव दीक्षितलाही अटक केली आहे.

गौरवच्या घरातून एनसीबीच्या छाप्यात एमडी ड्रग्स, चरस आणि इतर औषधे जप्त करण्यात आली होती. चित्रपट कलाकार एजाज खानच्या चौकशीच्या आधारे गौरवला अटक करण्यात आली.

एनसीबीने यापूर्वी मुंबईचा सर्वात मोठा औषध पुरवठादार फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला अटक केली होती आणि सुमारे 2 कोटी रुपयांची औषधे जप्त केली होती.

महत्वाच्या बातम्या –

हनी सिंगच्या अडचणींत वाढ; घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं फटकारलं, म्हणाले…

भावाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? ऋषी कपूर यांच्या भावाने केला खुलासा

…म्हणून भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीने मामासोबत घेतले फेरे; व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर सात महिन्याने वरूण धवनने केला मोठा खुलासा, म्हणाला…

ऐकावं ते नवलंच! मोबाईलच्या नादात भररस्त्यात आई बाळाला विसरली अन्…; पाहा व्हिडीओ