धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा

रायगड | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारच्या पार गेला आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रायगडमधील उरण तालुक्यात एकाच वेळी 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

रायगडमधील उरण तालुक्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण करंजा गावातील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्या सर्वांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

15 जणांना नवी मुंबईतील एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र अशा पद्धतीने एकाच दिवशी इतके रुग्ण आढळल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तसेच रायगड जिल्ह्याची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचं बोलल जात आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 20 हजार 228 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी

-…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!

-उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत

-“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

-“भारत कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”