देश

आत्तापर्यंत 30 लाख मजूर स्पेशल ट्रेन्सनी आपापल्या घरी पोहोचवले- पीयूष गोयल

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच सरकारनं रेल्वे सेवादेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता हळहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी 200 विशेष नॉन एसी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या ट्रेनच्या तिकिटांचं आरक्षणही सुरू करण्यात आलं होतं. तसेच आतापर्यंत 30 लाख मजुरांना श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली आहे.

सध्या देशातील 1.7 लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्री सुरू करण्यात येणार आहे. तसंच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना ठराविक रेल्वे स्थानकांवरील तिकिट विक्री सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात प्रोटोकॉल तयार केला जात असल्याचं पीयूष गोयल म्हणाले आहेत.

दरम्यान, आमच्यासाठी हे खुप कठीण मिशन होतं. पण आम्ही त्यात यशस्वी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे या मिशनवर लक्ष ठेवून आहेत, असंही पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत

-काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

-‘परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची संधी साधा’; शिवेंद्रराजेंचं स्थानिकांना आवाहन

-निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण…