10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

नवी दिल्ली | भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकंटादरम्यान 561 पदांची भरती जारी केली आहे. फक्त दहावी पास उमेदवारदेखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात.

561 पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यामुळे दहावी पास उमेदवारांना चांगला फायदा होऊ शकतो. ईस्ट कोस्ट रेल्वेने ही भरती जारी केली आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वेने जारी केलेल्या भरतीत नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी 255 पद, फार्मासिस्टसाठी 51 पद आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी 255 पद असे एकूण 561 पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार 22 मे 2020 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे 10 पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतो.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

-अरविंद शाळीग्राम यांच्याकडे दिलेला पुणे विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार रद्द करा- राजेंद्र विखे

-शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

-आमदार धीरज विलासराव देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर; खते बियाणे पुरवठा योजनेचा शुभारंभ

-तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता?; राहुल गांधी म्हणतात…