ऐन हिवाळ्यात गारपिटीचं सावट! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | सर्वत्र सध्या जोरदार थंडीचा मोसम चालू आहे. दररोज थंडी वाढत असल्यानं नागरिक स्वेटर किंवा इतर गरम कपडे घातल्याशिवाय बाहेर पड नाहीयेत. अशात आता राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. अशात राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी अनेकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

वातावरणातील बदलांमुळे ऋतूमध्येही मोठा बदल जाणवत आहे. वातावरणात होणाऱ्या या बदलांमुळे अवकाळी पाऊस पडत असल्याचं चित्र मागील काही दिवस होतं. सध्या ऐन थंडीतही पाऊस हजेरी लावणार असल्यासारखं वातावरण तयार होत आहे.

राज्यभरात कडाक्याची थंडी पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी नागरिक फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतात. त्यांना हवामान खात्यानं इशारा दिला आहे.

येत्या आठवड्याच्या शेवटी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असल्यानं फिरायला जाणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 4 दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशाच्या उत्तरेकडील भागात पाश्चात्य विक्षोभामुळे काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे या भागांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, विकेंडला कोकणात फिरायला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. या अवकाळी पावसामुळं अनेकांचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान होईल असा अंदाज वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला