ऐन दिवाळीत पावसाचं सावट! पुण्यासह ‘या’ 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही महिन्यापासून राज्यासह देशभरात पावसाने कहर केला होता. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

अशातच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

काही दिवसापासून कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर आता अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.

त्यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि लातूर या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्यापासून 4 दिवस पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाण्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढचे 4-5 दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि कोल्हापूर, साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 3 दिवसात वरच्या दिशेने येवुन दाट होण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

आता मोसमी वारे राज्यात सक्रिय असल्याने पूरक वातावरण असल्याने परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

मागील 3 ते 4 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढल्याचं पहायला मिळतंय. जळगावमध्ये 12 अंश सेल्सियसची नोंद झाली होती.

दरम्यान, हवामान बदलामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी दिवाळीनंतर वाढणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर या वर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्याची देखील शक्यता वर्तण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“…पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर एक शब्द देखील काढला नाही”

पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

’25 वर्ष आम्ही नको ती अंडी उबवली’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे म्हणतात…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिली पुन्हा एकदा दिवाळीची भेट 

 “शिवसेनेच्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा, आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही”