मुंबई | काही दिवसांच्या विसाव्यानंतर पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीत हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या पावसानं ऐन दिवाळीत हजेरी लावल्यानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आताही थंडीचा ऋतू असला तरी हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाही. या दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढला असल्यानं त्याचा परिणाम आता कोकण किनाऱ्यावर होत असलेला पहायला मिळत आहे. अशातच उत्तर कोकण ढगाळ वातावरणासह मुंबई, ठाणे, पालगर, नाशिक, रायगड आणि पुण्यात वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील 48 तासांत त्याची तीव्रता कमी होणार आहे. कोकणात आणखी दोन दिवस काही ठिकाणी तुरळक अरबी समुद्र, पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्याची शक्यता, कोकण, पावसाची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
पुढील दिवसात पडणाऱ्या पावसामुळे शेेती आणि अनेक पीकांचं नुकसान होणार असल्याचं हवामान खात्याकडुन सांगण्यात आलं आहे. अवकाळी पावसामुळे ठंडी वाढली आहे.
बदलत्या हवामानामुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
‘तुमच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात’; राजू शेट्टींचा थेट इशारा
‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा
गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर