LIVE कार्यक्रमात रैना-इरफानचं भांडण! प्रिती झिंटाचं नाव घेताच इरफानने सोडला शो; पाहा व्हिडीओ

मुंबई | पंजाब आणि कोलकाता यांच्यातील आयपीएल सामन्याआधी LIVE शोमध्ये राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे. भारतीय संघाचे माजी दोन खेळाडू आता स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करत आहेत. त्यावेळी गोंधळ उडाला.

पंजाबच्या फलंदाजीवर इरफान पठाणला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंजाब संघाच्या फलंदाजीची कौतुक करत इरफान खेळाडूंचं कौतुक करत होता. त्यावेळी रैनाने मधेच इरफानला थांबवलं आणि तू पंजाब आणि प्रिती झिंटाकडून खेळलाय, असं रैना म्हणाला.

पंजाबसाठी ही चांगली गोष्ट असल्याचं रैना म्हणाला. तेव्हा इरफान नाराज झाला. त्यावर ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे आपण क्रिकेटच्या गोष्टी करतो. टीमच्या गोष्टी करत आहोत, असं बोलणं योग्य नाही सुरेश, असं इरफान म्हणाला.

क्रिकेटच्या गोष्टी क्रिकेटपर्यंत रहाव्यात. तूझी आणि माझी दोस्ती आहे. त्यामुळे ही गोष्ट योग्य नाही, असं म्हणत तुम्ही शो करा मी जातो, म्हणत इरफान निघून गेला.

त्यानंतर अॅकरने रैनाला समजवून सांग असं सांगितलं. त्यानंतर रैना इरफानकडे गेला आणि चल म्हणत घेऊन आला. त्यानंतर अॅकर आणि इऱफान हसू लागले. त्यानंतर हा एप्रिल फुल होता, असं लक्षात आलं.

दरम्यान, त्यानंतर सगळे जोरजोरात हसू लागले. त्यानंतर पंजाबच्या फलंदाजीबद्दल इरफानने आपलं मत मांडलं.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

Stock market : आता शाळेतच विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेअर मार्केट’चे धडे

Ramdas Athawale: “…तोपर्यंत सरकार पडणार नाही”, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”