पुण्यात पावसाचे थैमान; भिंत कोसळून पाच जण ठार

पुणे: पुण्यात काल रात्री पावसाने तुफान ब‌ॅटिंग केली. पावसामुळे अरण्येश्वर परिसरातून जाणाऱ्या आंबील नाल्याने रौद्रावतार घेतला. नाल्याचे पाणी टांगेवाला काॅलनीत शिरल्याने एका घराची भिंत कोसळली. यात पाच जण ठार झाले आहेत.

पाच जण बेपत्ता असून, एनडीआरएफचे पथक शोध घेत आहेत. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुणे शहरातील अनेक वस्त्या आणि नागरी वसाहतींना पाण्याचा तडाखा बसला.

सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. पाच बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील सोसायट्या, घरे आणि वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

शहरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला. पावसाची संततधार कायम राहिल्याने शहरातील अनेक भागात पाणी तुंबायला सुरूवात झाली. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर रस्त्यांना ओढ्या-नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले.

 

महत्वाच्या बातम्या-