पुढील तीन दिवस ‘या’ भागात पावसाळी वातावरण, हवामान खात्याचा इशारा

मुंबई | सध्या राज्यात थंडीची लाट आली आहे. मात्र हवामानाच्या बदलत्या रुपांमुळे ऋतूंवर परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता हिवाळा सुरु झाला असून ऐन हिवाळ्यातही अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळाली.

वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र चांगलाच गारठला होता. मात्र आता हळूहळू थंडीही कमी व्हायला लागली आहे. थंडी कमी होत असली तरी काही ठिकाणी अजूनही पाऊस कोसळत आहे.

राज्यात काही ठिकाणी थंडी गायब झाली असून पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी राज्यात पुढच्या 4 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय वारे पण जोरदार असण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

पुढे होसळीकर यांनी म्हटलं की, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग प्रभावित असणार. 3,4 दिवशी प्रभाव कमी होण्याची शक्यता. विजा चमकताना बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे.

थंडी सुरू झाली असे वाटत असतानाच दक्षिणेकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. तिथे जोरदार पाऊस झाला. पाठोपाठ अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा परिणाम आता राज्यावर दिसून येत आहे.

दरम्यान, राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आताही थंडीचा ऋतू असला तरी हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “पंतप्रधान मोदी येणार, त्यामुळे तीन दिवस बाल्कनीत कपडे वाळत घालू नका”

  इतिहास घडला! कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

  पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, वाचा आजचे ताजे दर

  समीर वानखेडेंचा मुंबईत रेस्ट्रो बार, फोटो शेअर करत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

  लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय