महाराष्ट्र मुंबई

मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीविरोधातील वृत्त माध्यमांद्वारे मिळत आहेत. त्याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. 

मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही. तुमच्याकडून मी या बातम्या ऐकत आहे. मला ते आणखी काही हॅलो करायला घरी आले नाहीत, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं आहे. 

येत्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यासाठी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी ईडी चौकशीबाबतच्या प्रश्नाला आक्रमक उत्तर दिलं आहे. 

राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकमुखाने ईव्हीएमला विरोध केला आहे. ईव्हीएमला विरोध करत 21 ऑगस्टला सर्व विरोधकांनी मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे. 

हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नसेल. कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह या मोर्चामध्ये नसेल, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. 

आम्ही महाराष्ट्रातील घराघरात जाऊन अर्ज भरुन घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगकडे अर्ज देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??”

-“भाजप-सेनेची यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी मात्र राष्ट्रवादीची रयतेच्या बुलंद आवाजासाठी”

-उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???

-…तर काट्याने काटा काढावा लागेल; शिवेंद्रराजेंचं खुलं आव्हान

-…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले

IMPIMP