‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका तर…’; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई | मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केलंय.

मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. ही मदत करत असताना अनेकांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे प्राण धोक्यात घातले. काही जणांना कोरोनाची लागणही झाली. पण ना ते मागे हटले, ना त्यांचे कुटुंब, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान’; शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

-तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

-गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

-‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

-कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी