राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावरुन मोठा वाद, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपलं नवं व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपाध्यक्ष अमित शहांवर या व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला आहे. यासाठी गणपती बाप्पाचा वापर करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे राज ठाकरेंचं व्यंगचित्र-

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात नरेंद्र मोदींना गणपतीच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक, असं कॅप्शन या व्यंगचित्राला देण्यात आलेलं आहे. मोदी ज्या उंदीरमामांवर विराजमान झाले आहेत त्या उंदीरमामांच्या रुपात भाजपाध्यक्ष अमित शहांना दाखवण्यात आलं आहे.

वाद का निर्माण झाला आहे?

राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढताना गणरायाचा वापर केला आहे. गणरायाच्या रुपात मोदींना दाखवण्यात आलं आहे. अनेकांना हे पटलेलं दिसत नाहीये. ट्विटर, फेसबुकवर अनेकजण यासंदर्भात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. गणपती बाप्पाची विटंबना आहे, अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. याशिवाय राज ठाकरेंनी हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. काही जणांनी तर राज ठाकरेंना हे व्यंगचित्र मागे घेण्याची मागणी केली आहे तसेच माफी मागण्याची देखील मागणी केली आहे.

सोशल मीडियावरील निवडक प्रतिक्रिया-

 

https://twitter.com/padmakarng/status/1041698807845724160

 

 

https://twitter.com/redkar_sadanand/status/1041715805791113218