महाराष्ट्र मुंबई

नरेंद्र मोदींच्या हिटलरशाहीवर राज ठाकरेंचा प्रहार, पहा राज यांचं नवं व्यंगचित्र

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं नवीन व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आणीबाणीच्या मुद्द्यावरुन भाजपकडून इंदिरा गांधींवर जी चिखलफेक सुरु आहे, त्या मुद्द्याला धरुन राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटलं आहे. 

राज ठाकरेंनी काढलेल्या या व्यंगचित्रात नरेंद्र मोदींना आणीबाणीवर बोलताना दाखवलं आहे. त्यांच्या पायाखाली काही माणसं दाखवण्यात आली आहेत. निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, टीव्ही चॅनेल्स अशी या माणसांना नावं देण्यात आलेली आहेत. या व्यंगचित्रात अमित शहांना देखील दाखवण्यात आलं असून ते मोदींच्या भाषणावर टाळ्या वाजवत आहेत. 

आणीबाणीच्या विरोधात भाजपकडून सध्या देशभरात काळा दिवस पाळला जातोय. मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. भाजपकडून आणीबाणीच्या कालखंडाविषयी भरभरुन बोललं जातं, मात्र मोदींच्या अघोषित आणीबाणीवर मात्र ब्र सुद्धा काढला जात नाही. 

राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अमित शहा टाळ्या वाजवत असून त्यांच्या रुपाने भाजप त्यांच्या पाठीशी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मोदींची ही एकप्रकारे आणीबाणीच असल्याचं राज ठाकरेंना सूचित करायचं असावं, असं दिसतंय. 

IMPIMP