मोठी बातमी! राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 1 जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील रुग्णालयात पोहोचले.

चाचण्यांदरम्यान कोव्हीड डेड सेल्समुळे भूल देता येणं शक्य नसल्याचं डॉक्टर म्हणालेत. करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या व्याधीने डोके वर काढले होते. राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता.

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं निश्चित झालं होतं. उद्या ही शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आता कोरोनातून सावरल्यानंतर शस्त्रक्रिया करणार येईल, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

धक्कादायक! प्रसिद्ध गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही- देवेंद्र फडणवीस 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही” 

सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 

Hyundai ची Mahindra ला जोरदार टक्कर; ‘ही’ जबरदस्त कार लवकरच बाजारात येणार