पुणे | उद्धव ठाकरे 1993 च्या दंगलीची आठवण काढतात. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरज काय, असंही बोलले. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उद्या औरंगाबादचे नामांतर झाले तर कशावर बोलायचे, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडतो. त्यामुळे हा मुद्दा सतत पेटवत ठेवला जातो, असंही ते म्हणालेत.
संभाजीनगर, जालन्यात पाणी येत नाही. पण त्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करतो की, त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
मला वाटलं औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचा माणूस गेल्यावर महाराष्ट्र खवळेल. पण महाराष्ट्र थंडच. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात. त्याची एवढीशी कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघून या. त्याचा विस्तार आज 15 ते 20 हजार फुटात झालाय, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
अफजलखानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी फंडिंग येतंय. हे फंडिंग देणाऱ्या अवलादी कोण आहेत? कारण आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला कसलंही देणं-घेणं नाहीये. आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही”
“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….”
राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार