भाजप-मनसे युतीवर राज ठाकरेंकडून फुलस्टाॅप?, कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात आता चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय.

राज्यात शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजप एकाकी पडली होती.

अशातच मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची जोरदार चर्चा सुरू होती. राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच चर्चा देखील झाली होती.

त्यानंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून चर्चा फिसकटल्याचं समोर आलं होतं. अशातच आता भाजप-मनसे युतीवर राज ठाकरे यांनी काही स्पष्ट संकेत दिले आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

युतीच्या चर्चेत न पडता स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहा. युती होईल की नाही ते पुढे बघू, असा कानमंत्री राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

2009 पासून आम्ही कोणाशीही युती केली नाही. समोरून प्रस्ताव आला तर बोलणी सुरूच ठेवणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, युतीचा निर्णय हा राज ठाकरे घेणार आहेत. बाकी कोणीही घेऊ शकत नाही, असंही नांदगावकर म्हणाले आहेत. टोकाची भूमिका घेऊ नका असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”

अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…