राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे रवाना

मुंबई : कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी मनसे प्रमुख ठाकरेंना ईडीने नोटीस बजावली आहे. त्याबाबत राज ठाकरे काही वेळातच ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. यावेळी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरेही राज ठाकरेंसोबत ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 

राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सून मिताली ठाकरे ईडी कार्यालयात रवाना झाले आहेत. मनसेचे काही नेतेही राज ठाकरेंसोबत ईडी कार्यालयाकडे गेले असल्याचं पाहायला मिळतंय.

मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘EDiots Hitler’ असं लिहिलेले टी-शर्ट घातले आहे. हेच टी-शर्ट घातल्यामुळे संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. 

राज ठाकरेंच्या सांगण्यावरुन सर्व कार्यकर्ते शांततेतं पालन करत आहेत. मात्र राज ठाकरेंबाबत कोणताही गैरप्रकार घडल्यास आम्ही शांत बसणार नाही. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचं बाळा नांदगावकरांना आवाहन

-मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

-राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी; संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

-पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

-मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय?; धनंजय मुंडेंची सडकून टीका