Top news महाराष्ट्र मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाला कोरोनाने वेढा दिला आहे. राज ठाकरेंच्या घरी घरकाम करण्याऱ्या 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे.

कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. यानंतर त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. काल तर एकाच दिवशी पाच हजार रूग्ण आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“संध्याकाळी पेट्रोल-डिझेल विकत घ्या, सकाळी विका आणि आत्मनिर्भर व्हा”

-पडळकरांची पवारांवरील टीका आठवलेंनाही आवडली नाही, म्हणाले…

-यंदा गणेशाची मूर्ती किती फूट असावी?, मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

-या दोन महिन्यांत कोरोनाचे रूग्ण वाढणार, आरोग्यमंत्री टोपेंनी व्यक्त केली भिती

-‘जास्त पैसे घ्याल तर…’, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची खासगी दवाखान्यांना तंबी