…अन् भर सभेत राज ठाकरेंनी केली संजय राऊतांची नक्कल

पुणे | केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजप तर एकमेकांवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांची भर सभेत नक्कल केली आहे.

संजय राऊत पत्रकार परिषदेत किती ते नखरे करतात अन् पत्रकार परिषद झाली की खांद्यावर हात टाकून हसतात, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी खांदे उडवत आणि मान फिरवत राऊतांची नक्कल केली.

राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात सभेत बोलत होते. मनसेचा वर्धापन दिन प्रथमच पुण्यात साजरा होतोय. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

दरम्यान, सरकार आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. या दोघांनाही राज्यातील जनतेचं काही पडलेलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर