राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी; संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं आवाहन केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील ईडी कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्त, आजूबाजूला कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये. म्हणून सर्वत्र बॅरिकेट्स लावल्या, तसेच लालबाग पूलावरही पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

शिवसेना भवनासमोरच ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बिल्डींग आहे. याच ठिकाणीच्या खरेदीप्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. दादर, शिवाजी पार्क, शिवसेना भवन या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी राज ठाकरे यांची आज ईडी चौकशी होणार आहे.  सकाळी 10.30 वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मनसेचे नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. 

‘कोहिनूर सीटीएनल’मध्ये आयएल अ‌ॅण्ड एफएस ग्रुपचं कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

-मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय?; धनंजय मुंडेंची सडकून टीका

-यु ब्रॉडबॅन्डची इंटरनेट सेवा… पुणेकर म्हणतात नको रे देवा….!

-शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर खासदार सुनिल तटकरे संतापले; म्हणतात…

-पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल- प्रियांका मैदानात!