“संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही… तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर त्याचा मला जास्त त्रास होईल”

मुंबई | नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या मनसेचे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं होतं. जीवन संपवण्यापुर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या कार्यकर्त्याने घेतलेला हा टोकाचा निर्णय चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. त्यांनी एक भावूक पोस्ट लिहित कार्यकर्त्यांना एक आवाहन करत सुनील इरावार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण हा संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, मला माझ्या पक्षाचे राजकारण जातपात आणि पैसा या गोष्टींवर चालवायचं नाही. यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल, असं म्हणत ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

दरम्यान, तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका असं म्हणत ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचं आत्मबल वाढवण्याचं काम केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही… तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर त्याचा मला जास्त त्रास होईल”

‘या’ बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शरद पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, समोर आला हा अहवाल….

पंडितजींच्या जाण्याने भारताच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाली- नरेंद्र मोदी

पद्मविभूषण प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचं निधन