औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद!

पुणे |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्याआधी राज ठाकरे दगडूशेठ गणपती चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरेंनी दगडूशेठ गणपतीची आरतीही केली.

पुण्यात आल्यावर राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांची भेट घेतली आहे. पक्षाचा नवा झेंडा आणि धोरणांबाबत राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय.

नव्या राजकीय भूमिकेबाबत राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून काही सल्ले घेतले असल्याचंही बोललं जात आहे. बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आज पुण्यात आले होते.

दरम्यान, येत्या पंधरा दिवसात ते पुन्हा पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याचं पक्षातील नेत्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे पक्षाच्या मेळाव्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या- 

-भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आणि नेत्यांमध्ये घुसमट- शरद पवार

-काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरातांना हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?

-आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही- अमित शहा

-दिल्ली निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली; अमित शहांची कबुली

-‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर