राज ठाकरे नव्हे ‘खाज’ ठाकरे; अमोल मिटकरींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची कास धरल्यानंतर आता फक्त राज्यात नव्हे तर देशातील राजकीय वातावरण धार्मिक झालं आहे. राज ठाकरे येत्या 5 तारखेला अयोध्या दौरा देखील करणार आहेत.

अशातच आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करण्यास सुरूवात केली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे करत जोरादार निशाणा लगावला आहे. भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

अमोल मिटकरींना यावेळी थेट हनुमान चालिसा म्हणून देखील दाखवली. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात, चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो, असं मिटकरी म्हणाले आहेत.

निसर्गाने आम्हाला दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं, असंही मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील येत्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर आता मनसे आणि राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता येत्या काळात हा संघर्ष नेमकं काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का?”

“भाजप पक्षाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे” 

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड 

आयडिया, एअरटेल सगळ्यांची सुट्टी होणार?, जिओनं आणला धमाकेदार प्लॅन 

“भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही”