बोल पक्षात येतोय का? राज ठाकरेंचं ‘यांना’ मंचावरच पक्षप्रवेशाचं निमंत्रण

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी स्टेजवरच आपल्या मित्राला आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली.

संजय बरा बोलतोस, येतो का आमच्या पक्षात, असं म्हणत राज ठाकरेंना त्यांचे मित्र कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना मनसेत येण्याचं जाहीर निमंत्रण दिलं.

मी ग्रॅज्युएट नाही आणि मला आजपर्यंत कुणी डिग्रीही विचारली नाही. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो, असं राज ठाकरे बोलताना म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकार ज्यावेळेला चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकतो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकामध्ये कोणतीना कोँणती कला असते, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, शिवजयंती साजरी करताना तिथी सोडा आणि तारीख धरा; राष्ट्रवादीचं आवाहन

-भाजप खासदाराच्या चोराच्या उलट्या बोंबा; आता म्हणतात मी तसं म्हणलोच नाही…!

-‘त्या’ राक्षसालाही पेट्रोल टाकून जिवंत जाळा; पीडितेच्या आईची मागणी

-केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआरसीबाबत केला मोठा खुलासा!

-दिलेला शब्द मी पाळणारच…. मार्चमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती करणार; उद्धव ठाकरेंचं वचन