महाराष्ट्र मुंबई

“220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??”

मुंबई |  ‘ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा’ या घोषवाक्याखाली राज्यातील सर्व विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम हद्दपार झालं पाहिजे, असा सूर पत्रकार परिषदून निघाला.

पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कपिल पाटील, बी. जे. कोळसे पाटील उपस्थित होते.

अमेरिकेत जर ईव्हीएम मशिनची चिप बनत असेल तर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तसेच येत्या 21 ऑगस्टला कोणत्याही झेंड्याखाली नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आणि ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चा काढणार आहोत, असंही राज म्हणाले.

220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??, असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला विचारला. तर लोकांमध्ये मिसाळल्यावर तरी तुम्हाला सहानभुती मिळेल… ते तरी करा, असं लगोलग प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राज यांना दिलं.

ईव्हीएमबाबत असलेले समज-गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. आमचे आंदोलन लोकशाहीसाठी महत्वाचे आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या ‘ईव्हीएम हटाव-लोकशाही बचाव’ या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टीका केली. जनतेत मिसळला असतात तर अशी आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर आली नसती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजप-सेनेची यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी मात्र राष्ट्रवादीची रयतेच्या बुलंद आवाजासाठी”

-उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???

-…तर काट्याने काटा काढावा लागेल; शिवेंद्रराजेंचं खुलं आव्हान

-…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले

…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!

IMPIMP