खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’- राज ठाकरे

मुंबई | डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. नाट्य आणि सिनेसृष्टीची कधीही न भरुन येणारी हानी त्यांच्या जाण्याने झाली आहे.  त्यांच्या निधनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माणसाने कसं अर्थपूर्ण जगायला हवं ह्याचं चिंतन डॉ. लागू ह्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यातील सामोरं आलेलं वास्तव अप्रतिम पद्धतीने अभिनयातून मांडलं. खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’. आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र श्रद्धांजली, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.

‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये लागूंनी काम केलं आहे. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली होती.

डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी 1969 मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता.

 

महत्वाच्या बातम्या-