मुंबई | नेहमीप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणी सभा होत आहे.
राज ठाकरे आजच्या सभेत नक्की काय बोलणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. जमलेल्या माझ्या तमामा…, असे शब्द ऐकण्यास आता सर्वच आतूर झाले आहेत. अशातच राज्यातील सुरू असलेल्या राजकारणावर राज’गर्जना होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पहायला मिळतं. अशातच आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या सभेवर भाष्य केलं आहे.
आम्हाला सभेच्या गर्दीची काळजी नाही. राज ठाकरे यांची सभा कायम रेकॉर्ड ब्रेक होत आली आहे. त्यामुळे आम्हाला काळजी नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
उलट करोना काळात बघितलं तर त्यांनी जिथं जिथं शाखा उद्घाटन केलं तेथे निर्बंध असूनही धक्काबुक्की होईल अशी गर्दी होती, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही. माझ्यापेक्षा राजकारणातील त्यांना जास्त कळतं. त्यांना लोकांचे प्रश्न जास्त माहिती असतात, असंही त्या म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचं आयुष्य रोगराईमुक्त जावो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बंद होऊन त्यांना सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळू दे, अशी प्रार्थना देखील राज ठाकरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला
Ramdas Athawale: “…तोपर्यंत सरकार पडणार नाही”, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं
‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”