“शरद पवार संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही”

मुंबई | मशिदींवरी भोंग्यांवरील राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.

शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर पुन्हा मोदींना भेटले आणि मलिक मध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले. संजय राऊतांना कुठे लटकवतील ना,कळणार सुद्धा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार म्हणता मी जातीवादीचे राजकारण करतो. मी लोकांना भडकावतो. राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावं, राज ठाकरे भूमिका बदलतो म्हणून. सोनिया गांधी या परदेशी पंतप्रधान देशाला चालणार नाही, हे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यानंतर हाच धागा पकडून शरद पवार बाहेर पडले. 1999 ला बाहेर पडले आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. मी कोणती भूमिका बदलली? असा उलटसवाल राज यांनी केला.

शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.

शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यानी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ 

मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका 

राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेला ‘हनुमान’ पोलिसांच्या ताब्यात; झालं असं की… 

‘ये शेपटं धरतो, गरगर फिरवतो फेकून देतो’; राज ठाकरे आव्हाडांवर बरसले

राज ठाकरे यांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका, म्हणाले…