शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा; राज ठाकरे म्हणाले, मैदानाचा वारसा…

मुंबई | उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवसेनेला दिलासा देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने शिवाजी पार्कात (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर आवाज शिवसेनेचा असणार, यात आता कोणाचे दुमत नाही.

मागील कित्येक दिवस शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात खडाजंगी सुरु होती. अखेर काल न्यायालयाने निकाल देत या वादावार पडदा टाकला.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्षाने देखील शिवसेनेच्या दुखण्यावर मीठ चोळले होते. त्यांनी त्यांना दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेने परवानगी द्यावी, नाहीतर जनता मोठ्या मनोरंजनाला मुकेल, असा चिमटा काढला होता.

अखेर शिवसेनेला न्याय मिळाला, असे म्हणावे लागेल. कारण न्यायालयाने शिवसेनेच्या पारड्यात न्याय केला. त्यावर आता सर्व विरोधकांच्या तोंडात मारल्याप्रमाणे झाले आहे.

भाजप, एकनाथ शिंदे गट आणि मनसेकडून यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया आल्या आहेत. मनसेचे माजी नगरसेवक आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी पाच शब्दांत आपले मत नोंदविले आहे. “वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो”, असे देशपांडे यांनी ट्वीट केले आहे.

मागील काळात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. भाजपच्या देखील अनेक नेत्यांनी ठाकरेंची भेट घेतली होती. पण वेदांता फॉक्सकॉनवरुन ठाकरेंनी चौकशीची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटमुळे त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे उघड झाले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

अमित शहांची लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांवर मोठी टीका; म्हणाले, लालूजींनी आयुष्यभर…

न्यायालयाने फटकारल्यावर शिंदे यांच्या गटाकडून पहिली प्रतिक्रिया; दादा भुसे म्हणाले…

नवनीत राणांना लवकरच अटक होणार, न्यायालयाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद निकालात; शिवाजी पार्कवर कोण घेणार, ‘दसरा मेळावा’?

फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निकाल जाहीर