…हे आता थांबायलाच हवं; राज ठाकरेंचं आवाहन

मुंबई : भारत हा जगभरातल्या देशांमध्ये वाघांसाठी सुरक्षित मानला जात असला तरीही वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात फक्त 86 ते 90 वाघ असल्याचं समोर आलं आहे. आज सोमवार आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ट्वीट केले आहेत. 

वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. पण तोच आज अस्तित्वासाठी झुंज देतोय, या सगळ्याला कारण म्हणजे होणारी बेबंद शिकार आणि मानवी वस्तीत वाघ आणि मानव यांच्यात होणारा संघर्ष, असं राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.

वाघासारखा प्राणी खरंतर मानवी वस्तीपासून जास्तीत जास्त दूर रहायचा प्रयत्न करतो, पण आपणच त्याच्या वस्तीवर आक्रमण करतो. हे थांबवायला हवं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018चा अहवाल सादर करण्यात आला. त्यावरुन वाघांची संख्या कमी झाली असल्याचं आढळून आलं.  

वाघांची गणना व्हायलाच हवी पण फक्त तेवढ्यावर न थांबता जंगलांवर मानवांचं होणारं अधिक्रमण कठोरपणे थांबवायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

महत्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

-“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

-काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

-महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही- चंद्रकांत पाटील