“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर अत्यंत खालच्या शब्दात टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुनावलं आहे.

शरद पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी केतकी चितळेला झापलं आहे. यासाठी राज ठाकरेंनी ट्विटरवर खुलं पत्रच पोस्ट केलं आहे.

राकोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही.त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं म्हणत राज ठाकरेंनीही केतकी चितळेला कडक शब्दात समज दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

आमचे त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत आणि राहतील. पण अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला हवा, असं पत्रात राज ठाकरेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले… 

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…” 

‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान 

मुंबईतील सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता लवकरच… 

 चिंतन शिबीर सुरू असतानाच काॅंग्रेसला जोर का झटका; ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडला पक्ष