महाविकास आघाडीचं सरकार पडेल का?, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत यावेळी महाविकास आघाडी सरकार पडणार का? असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना राज ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार पडेल असं वाटत नसल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे.

पाच लाख व्यावसायिक जेव्हा देश सोडतात. त्यावेळी नोकऱ्यांवर काय परिणाम याची आपण चर्चा करत नाही. आर्यन खानची बातमी आपण 28 दिवस चालवतो, सुशांत सिंह प्रकरण, अँटालिया प्रकरण आपण लावून धरतात. पण हे पाच लाख उद्योजक कुठे गेले याचा आपल्याला शोध घ्यावा वाटत नाही?, असा सवाल त्यांनी केला.

मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात. संभाजी नगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचं प्रकरण सुरु केलंय, अशी टीका त्यांनी केलीये.

केंद्रानं मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असंही राज ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, आज मनसेच्या मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काय रणनिती आखली गेली, याविषयी पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, स्ट्रॅटजी वगैरे आत्ताच सांगत नाही. तुम्हाला सांगण्याएवढं अद्याप काही ठरलेलं नाही. जेव्हा ठरेल तेव्हा सांगितलं जाईल, असं राज ठाकरे म्हणालेत.

सचिन वाझे हा शिवसेनेचा माणूस आहे. मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे मित्रं आहेत. मग वाझेंनी अँटालियाच्या खाली गाडी का ठेवली? हा एवढा साधासोपा प्रश्न आहे, असं सांगतानाच अँटालिया खाली गाडी ठेवली यावर फोकस न राहता, हे प्रकरण दुसऱ्याच मुद्द्यावर भरकटत जाईल, हे मी आधीच सांगितलं होतं, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट

MLC Election | देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले 

“दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते तरी दाखवावेत” 

…तर 100 कोटी देतो, हा माझा शब्द आहे- अजित पवार 

“पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं नेतृत्व”