‘तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही’ – राज ठाकरे

आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. यातच आजच्या दिनाच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महिलांना शुभेच्छा दिल्या आहे.

राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून स्त्रीशक्तीच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना मोलाचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांनी म्हटलं की, ‘8 मार्च आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे’ असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

‘मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही’ असं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

‘राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता’ असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्व महिलांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रियाही देताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यातही महिला दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जान्हवी कपूर, जितेंद्र जोशी आणि रिंकू राजगुरू हे सेलिब्रिटी उपस्थित होते. तर कोल्हापुरात प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्या वतीनं शहरातील गांधी मैदान ते बिंदू चौक या दरम्यान महिलांची रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने हजेरी लावली होती.

 

महत्वाच्या बातम्या –

रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्यामागचे सांगितले कारण, म्हणाले…

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना ‘ही’ अनोखी भेट, पाहा व्हिडीओ

आज सोन्याच्या दरात इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत दर

रोज गुळ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

“राज ठाकरेंच्या आवाहनामुळे राज्यातील कोरोना वाढला आहे”