Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

Raj Thackeray: “ये शादी नहीं हो सकती…”; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला

1 raj e1648911447910
Photo courtesy - facebook /MNS Adhikrut

मुंबई | गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर धडाडली आहे. राज ठाकरेंच्या सभेला मनसे कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे.

एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, साला पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

ये शादी नही हो सकती, असं नंतर ठरलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांची नक्कल करत “मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री…”, असं म्हणत टीका राज ठाकरेंनी केली.

तुम्ही यांच्यासाठी मतदान करता, यांचे गुलाम आहात का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. यांनी कोणतीही खेळी करावी आणि तुम्ही ते बघत राहावं, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं

 काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“भापमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”