Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

raj thac e1642068615841
Photo Credit - Twitter/@rajupatilmanase

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Manase) सुरूवातीच्या काळात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलने केले होती. आताही मनसे मराठीच्या मुद्द्यावरुन वारंवार प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे.

अशातच आता राज्यातील सर्व ठिकाणी मराठी भाषेत पाट्या असाव्यात यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारची कौतुक देखील केलं जात आहे.

अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray video) यांनी पत्र प्रसिद्ध करत राज्य सरकारचं कौतुक केलं आहे आणि याचं श्रेय महाराष्ट्र सैनिकांना दिलं आहे. त्यामुळे आता मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे.

राजकारणासह आता सोशल मीडियावर देखील श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू असल्याचं दिसत आहे. मनसेचे नेते आक्रमक होत आनंद साजरा करताना दिसत आहेत.

अशातच राज ठाकरे यांच्या जाहीर सभेमध्ये मराठी पाट्यांचा मुद्दा मांडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.

जळगावमधील एका सभेत मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केला होता. तो व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर, दुकानांच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, ही काय चुकिची गोष्ट आहे का?, असा सवाल राज ठाकरे या व्हिडीओच्या माध्यमातून विचारला होता.

कुठेही जा, जा गुजरातमध्ये, जा तामिळनाडूमध्ये, कोणत्याही प्रांतामध्ये जा तिथं त्यांच्या त्यांच्या दुकानांमध्ये त्यांच्या भाषांमधील पाट्या असतात, मग आमच्या महाराष्ट्रात का नाही?, असा प्रश्न राज ठाकरे या व्हिडीओमधून उपस्थित करत आहेत.

दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मराठी पाट्यांच्या मुद्द्याची लढाई किती गाजणार?, असा सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जातोय.

पाहा व्हिडीओ –

महत्वाच्या बातम्या-

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना 

“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा” 

राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी